Tuesday, June 8, 2010

~'आपल्या छंदाचं रुपांतर करीयरमध्ये करा' हा एक अनुकरणीय विचार आजच्या आपल्या तरूणपिढीमध्ये रुजू लागला आहे. त्याच अनुषंगाने, तरुणाईची क्रेझ असणार्‍या Automobiles मधल्या एक प्रतिभासंपन्न संधीची आपण ओळख करून घेणार आहोत.~

"अरे यार, या बाईकमध्ये अजून 'हे' असतं तर ती किती भारी झाली असती ना?", "आईशपथ! त्या कारचं बोनेट बघ. पण ground clearance मध्ये जरा झोल झालाय." ही आणि अशी तत्सम वाक्यं आता आपल्याला परिचयाची झाली आहेत. नव्या गाड्या, त्यांचे प्रोज-कॉन्स, लूक्स, परफॉरमन्स वगैरे विषयांशिवाय कॉलेजकुमारांचे दिवस जात नाहित. अनेकजण तर त्यांच्या गाड्या हव्या तश्या modify सुद्धा करून घेतात.
पण आपण केवळ bike freak , फारफारतर bike modifier न राहता Automobile designer व्हावं असा विचार कधी केलायत?

भारतीय वाहन उद्योग आणि त्यातील संधी

अमोघ वाढ आणि प्रगती झालेल्या Global Automobile Industry मध्ये भारत नवव्या स्थानावर आहे. इतकंच नव्हे, तर जगातल्या चार सर्वात मोठ्या वाहन निर्यातदारांमध्ये आपली गणना होते. भारतातल्या consumers च्या राहणीमानदर्जात झालेली वाढ आणि गरजांचा अव्याहत ओघ पाहता Automobile क्षेत्र येत्या तीन वर्षांत १६% पर्यंत वृद्धिंगत होईल असा तज्ञांचा कयास आहे, आणि इतक्या कमी कालावधीत एवढ्या मजला मारणार्‍या या व्यवसायाचा डोलारा सर्वार्थाने अवलंबून असणार आहे त्याच्या Automotive Designers वर.

Development प्रमाणेच Competitionसुद्धा अविश्वसनीयरित्या वाढल्याने वाहनव्यवसायात सतत नावीन्याला मागणी असते. या नावीन्याचा गाभा असतात डिझायनर्स. पुढिल दहा वर्षात भारतीय वाहनक्षेत्र २५ लाख रोजगारसंधी निर्माण करेल असा विश्वास Automobile Mission Plan ने नुकताच व्यक्त करून Auto. Designersचं या क्षेत्रातलं अढळपद आणि भविष्यातल्या अमाप संधीच अधोरेखित केल्या आहेत.


Automotive Designerचं कार्यक्षेत्र

तांत्रिकदृष्ट्या पाहायचं झालं, तर व्यावसायिक Automobile designing मध्ये पुढिल बाबी अंतर्भूत असतात.

[Flow Chart]

Concept Sketching

Clay Modeling

Prototype development

computer-aided design.

Manufacturing process design

साहजिकच या प्रत्येक प्रणालीमध्ये विविध क्षमतांचा कयास लागतो. संकल्पना निर्मिती करताना सौंदर्यशास्त्र (Aesthetics) आणि काही अंशी मनुष्य अभियांत्रिकी (Ergonomics) यांची तत्वं विचारात घेणं आवश्यक असतं. म्हणजे Interior, Exterior, Aerodynamics, Colours, Trim इत्यादींचा प्रभावी वापर करून वाहन अधिकाधिक आकर्षक आणि आधिकाधिक उपयूक्त व आरामदायी कसं करता येईल याचे Analytical आडाखे बांधावे लागतात.
प्राथमिक आणि अंतिम स्केचेसमध्ये Drawing पेक्षा Modelचा सर्वंकष विचार करण्याला अधिक महत्व असतं.

प्रारुपनिर्मिती (Prototype development) हे आणखीन एक वैशिष्यपूर्ण काम. संकल्पनेतल्या गाडिचं तुलनेनं छोट्या स्वरूपाचं मॉडेल तयार करणं म्हणजे मनोरंजन आणि कामाच्या समाधानाचा आनंद असतो. या Process चं महत्व वादातीत असल्याने Vehicle Designing च्या कोर्सेसमध्येही Prototype developmentवर विशेष लक्ष दिले जाते.

अभ्यासक्रम

विद्यार्थांची कल्पकता आणि उपयोजन यांचा मेळ घालण्याचं काम Automobile Designing चा अभ्यासक्रम करतो. Mobility Design, Presentation techniques, Computer Graphics, Vehicle Ergonomics अशा विविध विषयांद्वारे professional aspects शिकवले जातत. वेगवेवळे Projects, tours आणि कार्यशाळांच्या माध्यमातून Application घडवले जाते. ग्राहकाच्या गरजा कश्या ओळखाव्यात, इथपासून ते अंतिम डिझाईन test कसे करावे इथपर्यंत सर्व व्यावसायिक कक्षांचं संपूर्ण ट्रेनिंग हा कोर्स देऊ करतो.

जगभरातल्या मोजक्या प्रतिष्ठित institutes पैकी XXX, XXX आणि पुण्यात लोहगावमध्ये DYPDC College of ____ तर्फे Automotive Designचे Diplomas घेतले जातात. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी डि.वाय.पाटिल आणि दिलीप छाब्रिया ही अनूक्रमे शिक्षण आणि वाहन डिझायनिंग क्षेत्रातली दिग्गज नावे एकत्र आली आहेत ही बाब नक्कीच उल्लेखनीय आहे.

पात्रता
Automobile designer होण्यासाठी engineer व्हावं लागतं हा एक मोठा गैरसमज आहे. दोघांचीही कार्यक्षेत्र पूर्णत: भिन्न आहेत हे स्पष्ट आहे. मूळात ऑटो डिझायनर होण्यासाठी, अथवा डिझायनिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फार मोठं academic record आवश्यक आहे अशातला भाग नाही. - हवी आहे कल्पकता.
नवनव्या संकल्पना डोक्यात असणारा, त्यांवर शास्त्रोक्त विचार करू पाहणारा, सतत गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणारा, आणि अर्थातच Automobiles बद्दल दुर्दम्य passion असणारा प्रत्येक जण, योग्य शिक्षणानंतर एक यशस्वी Automotive designer बनू शकतो.

शेवटी, मनातील प्रतिमा रस्त्यावर मूर्त स्वरूपात धावताना पाहण्याचा निखळ आनंद केवळ ख्रिस बॅंगल किंवा दिलीप छाब्रिया प्रभृतींनीच घ्यावा असं थोडंच आहे? तुम्ही-आम्ही का नाही?




1 comment: